माझी आजी

 


फुलांच्या मऊ पाकळ्या तिच्या सुरकुत्लेल्या आणि खरखरीत हातांच्या त्वचेला स्पर्श करतात आणि तिला तिचे आयुष्य आठवते.

या हातांनी आयुष्यभर कष्ट केले. या सुरकुत्या त्यांच्या आयुष्याच्या आठवणी आहेत. त्यांनी वेदनांशी मैत्री केली. त्यांनी शेतात काम केले. त्यांनी कुटूंबाला कधीही रिकाम्या पोटी झोपू दिले नाही. त्यांनी कपडे आणि भांडी घासली. त्यांनी मुलांना मोठे केले, त्यांनी नातवंडांची काळजी घेतली.

हे एका आजीचे हात आहेत.

हे माझ्या आजीचे हात आहेत.

Comments